लोकमत सखी मंच खानापूर यांच्या वतीने आयोजित हास्ययात्रा कार्यक्रम प्रसंगीची काही क्षणचित्रे.. डॉ.वैशाली हजारे यानी नेटके संयोजन केले.त्यांनी खानापूर तालुक्यात केलेले महिलांचे संघटन,आरोग्य सेवा...त्यांच्यासाठी राबविलेले उपक्रम मोठे.प्रत्येक सखी सदस्या डॉ.मॅडम विषयी भरभरून बोलत होत्या.सामान्य परिस्थिती मधुन असामान्य बनलेले हजारे कुटंबिय प्रचंड नम्र आहे.उपस्थित सखी सदस्यांनी हशा आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आनंदाची लयलूट केली. निवेदक व गायक कलाकार अमरजित याने बहारदार निवेदनाने व कल्पकतेने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला.भूपाळी ते भैरवी या कार्यक्रमाचे निर्माते संपत कदम सर यांचे चिरंजीव अभिजित कदम यांनी सादर केलेला पोवाडा व ओव्या कळजात घर करून गेल्या..लोकमत इव्हेंट चे प्रशांत जाधव यांची धडपड व प्रयत्न कौतुकास्पद असेच.मातोश्री मंगल कार्यालयात झालेला कार्यक्रम रसिक सखींना आणि कलाकारांनाही समाधान देऊन गेला.दैनिक लोकमत चे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत कारण सखी मंच च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांच्या कला गुणांना वाव देणारे हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं.. एखादी सासूरवासी न माहेरी आल्यानंतर तिला जे समाधान,आनंद मिळत अगदी तसा अनुभव सखी मंच त्यांना देतो.....
जाता जाता......
सात वर्षांपूर्वी मी नवरात्र उत्सवानिमित्त खानापूर येथील महिला मेळाव्यास प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो.कार्यक्रम फारच रंगला...कार्यक्रम संपल्यानंतर एक आजी स्टेजवर आल्या त्यांनी बटव्यातील वीस रुपयाची नोट काढली नि माझ्या हातात ठेवली..मी हात जोडले... आजी पैसे कशाला....?
मी ते स्वीकारत नव्हतो... आजी म्हणाल्या... "बाबा आम्हा बायकास्नी मघापास्न एवढं हासविलस ...
गपगुमान ठेव... नातवाला आजीन भेट दिली अस समजून ते ठेव...तुझ्याकडं."त्या आजीनी माझ्या गालावरून मायेने हात फिरविला.मी ती नोट अजूनही जपून ठेवली आहे.
एका छोट्या कलाकारासाठी आजींनी दिलेली भेट अनमोल अशी होती.कार्यक्रम संपल्यानंतर माझी नजर त्यांना शोधत होती. त्यांची मी चौकशीही केली .पण त्या आजी वयोमानामुळे कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत..रात्री उशिरा घरी आल्यानंतर अल्बम मधील ती नोट पहिली. भले ही...ती जूनी पुराणी ..चुरगळलेली असेल ...पण माझ्यासाठी प्रेरणादायी अशीच आहे..