आष्टा येथे हिरकणी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या हिरकणी महोत्सवाची तिसऱ्या दिवसाची सुरुवात हास्ययात्रा या कार्यक्रमाने करण्यात आली. हास्यसम्राट मा.श्री.शरद जाधव सर यांनी आपल्या विनोदी शैलीतून रसिकांना पोट धरून हसायला लावले.गेल्या दोन वर्षांच्या लाॅकडाऊन नंतर प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात महोत्सवास उपस्थित राहून हास्ययात्रेचा मनमुराद आनंद लुटला.सदर कार्यक्रमास राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.वैभवदादा शिंदे.नगरसेवक व गणेश फौंडेशनचे अध्यक्ष मा.श्री.विजय मोरे नाना,सव्वालाखी आष्टा साहित्य मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.बाबासाहेब सोलनकर,नगराध्यक्षा मा.सौ.स्नेहा माळी,नगरसेवक मा.श्री.अर्जुन माने,मा.नगरसेवक मा.श्री.दिपक मेथे सर,बामणे सर उपस्थित होते.
सूत्रसंचालन मा.श्री.प्रमोद गुरव सर यांनी केले. प्रास्ताविक श्रद्धा लांडे यांनी केले आभार प्रदर्शन संस्थापिका -सौ सुनिता घोरपडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्षा सौ वर्षा देसावळे उपाध्यक्ष- सौ श्रद्धा लांडे, सचिव- सौ वैशाली डफळे तसेच संचालिका सौ सारिका शिंदे ,सौ वैशाली पाटील ,डॉक्टर मीना सुर्वे, सौ कविता पाटील ,सौ रेश्मा बसुगडे ,सौ गौरी माने यांनी परिश्रम घेतले.