Current Happenings

व्याख्यानमालेच्या माध्यमातून आईचा स्मृतिदिन साजरा करीत, प्रबोधनाची दिशा देणारा पाटील परिवार...

 





श्री.महात्मा बसवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व श्री.बसव बालसंस्कार केंद्र नागाव, ता.वाळवा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी माझ्या "सुख म्हणजे नक्की काय असतं...!" या विषयांवरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.आईचा स्मृतीदिन विविध पारंपरिक पद्धतीने सर्वजणच साजरा करतात.पण वाळवा तालुक्यातील नागाव गावातील सुपुत्र राजेंद्र पाटील सरांनी गावातील नागरिकांना प्रबोधन रुपी संस्काराची,विचारांची मेजवानी देऊन आपल्या दिवंगत मातोश्री कै.सुलोचना पाटील यांचा स्मृतिदिन साजरा करीत आहेत.गेली तीन वर्षे ते व्याख्यानमाला स्वखर्चाने चालवित आहेत.त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुरेखा पाटील यांची व पाटील परिवार व मित्रपरिवाराची त्यांना बहुमोल अशी साथ लाभत आहे.ज्या विचाराने, संस्काराने आईने आपल्यास वाढविले ते हृदयामध्ये नंदादिपसारखे तेवत ठेवणे हे कर्तव्य समजून बसव बालसंस्कार केंद्र,दर्जेदार व गुणवंत विद्यार्थी घडविणारी पूर्व प्राथमिक शाळा ही उत्तम प्रकारे चालवित आहेत.आईचा स्मृतीदिन समाजाला प्रेरणादायी ठरेल अशा पद्धतीने साजरा करून समाज मनात आदर्शवत ठरणाऱ्या या शिक्षक दांपत्याला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते,बागणी ग्रामपंचायतीचे सदस्य,सत्यशोधक विचारमंचचे संघटक मा.आनंदराव शेटे होते. नागावच्या सरपंच सौ. शुभांगीताई पाटील,श्री.महादेव पाटील,उमेश (नाना) पाटील,सोसायटीचे संचालक भाऊसाहेब पाटील, बसव बालसंस्कार केंद्राचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील (सर),सौ.सुरेखा पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.

काही कार्यक्रम वक्त्याला आत्मिक समाधान देऊन जातात  त्यापैकीच ही व्याख्यानमाला.हा योग जुळवून आणणारे माझे मित्र,प्रसिद्ध वक्ते,कीर्तनकार,प्रवचनकार,साहित्यिक प्रा.ऋषिकेश खारगे सरांना द्यावे तितके धन्यवाद थोडेच.


@शरद जाधव 

वक्ते व हास्ययात्रकार मो.नं.9890641670

www.sharadshow.com

Designed and Developed By: Tech Webz Services
Theme images by richcano. Powered by Blogger.