Current Happenings
महिला दिनी माता भगिनींना घडविली हास्ययात्रा
लोकमत सखी मंच व जायंट्स ग्रुप ऑफ प्रेरणा साहेली यांच्या वतीने हरिपूर येथे आयोजित महिला दिन कार्यक्रमात हास्ययात्रा कार्यक्रम सादर करण्याचा योग आला. आयुर्वेदाचार्य डॉ.योगेश माईणकर, डॉ.तृप्ती गायकवाड (कॅनडा),सखी संयोजिका अर्चना शिंदे,अभिजित कदम आदी उपस्थित होते.सौ.सुनीता शेरीकर, सौ.अमृता खोत आदींसह सखी सदस्यांनी नेटके संयोजन केले.महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमधील विजेत्या महिलांचा गौरव करण्यात आला.महिला दिनाच्या दिवशी उपस्थित माता भगिनींना हास्ययात्रा घडवित..क्षणभर तणावमुक्त करण्याच भाग्य मिळालं.
