ग्रामपंचायत नागावकवठे व महिला मंडळाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात हास्यायस्त्रा हा एकपात्री कार्यक्रम संपन्न झाला.हशा, टाळ्या सोबत जीवनाला दिशा देणारा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.उपस्थित महिला वर्गाने भरभरून असा प्रतिसाद दिला.
माता भगिनींनी तुमचे कुटुंबासाठी समाजासाठी योगदान मोठे आहे. दररोजच्या धकाधकीच्या दिवसातील काही काळ स्वतःसाठी द्या.सकारात्मक राहून येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जा.हास्य हे जीवनासाठी टॉनिक असून सदैव हसत व आनंदी राहिल्यास आयुष्य निरोगी व निरामय होईल असे प्रतिपादन हास्ययात्राकार शरद जाधव यांनी केले.
सरपंच सौ.सुलतानामुलाणी,उपसरपंचसुधीर पाटील,ग्रामपंचायत सदस्या सौ.आरती तुंगे,सौ.विजयाश्री सूर्यवंशी,सौ.प्रतिभा पाटील,सौ.जयश्री पाटील ,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी वाघमोडे,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छाया जाधव,रेश्मा पाटील आदी मान्यवरांसह महिलांची मोठी उपस्थिती होती. नायब तहसीलदार पदी निवड झाले बद्दल नूतन पाटील यांच्या मातोश्री सौ.संगिता पाटील,तसेच गावातील आशा वर्कर्स भारती पाटील,उर्मिला मोहिरे,आरोग्य सेविका,शिक्षक महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रा.सौ.आरती तुंगे यांनी बहारदार सूत्रसंचालनासह यशस्वी रित्या महिला मेळाव्याचे संयोजन केले.सौ.रोहिणी कोष्टी यांनी आभार मानले.