गॅदरिंगचा पाहुणा यशश्री इंग्लिश मिडीयम स्कूल सांडगेवाडी
डॉ.पतंगराव कदम शिक्षण संस्था सांडगेवाडी संचलित यशश्री इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी होते.संस्थेचे कार्यवाह सुनिल(बापू) सूर्यवंशी,भाऊसो सूर्यवंशी,कल्पेश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्याध्यापिका सौ.सुषमा पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.विद्यार्थ्यांनी कल्पकतेने तयार केलेल्या वस्तूंच्या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.शाळेने मोठ्या प्रमाणात राबविलेले विविध उपक्रम प्रेरणादायी असेच आहेत.विविध स्पर्धेतील यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे संस्थापक,दलितमित्र पांडुरंग तात्या सूर्यवंशी यांनी सांडगेवाडी येथील माळरानावर मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळांच्या विविध शाखांच्या माध्यमातून नंदनवनच फुलविले आहे.पहिली पासून इयत्ता बारावी पर्यंतच्या भटक्या व विमुक्त जातीतील लेकरांसाठी शिक्षणाची सोय केली आहे.यशश्री इंग्लिश मिडीयम स्कूलच्या माध्यमातून बालवाडी ते चौथी पर्यंत दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. सांडगेवाडी,पलूस शहरासह परिसरातील दहा बारा गावांतील विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाखेत शिक्षण घेत आहेत.